वैजापूर, : शहरातील वैजापूर-गंगापूर रस्त्यावर खाजगी शाळेतील शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत सावखेडगंगा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान माणिक
सुलताने वय ५७ वर्ष राहणार श्रीराम कॉलनी वैजापूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास क्रांती जिम समोर घडली.
या संदर्भात उपलब्ध महिती नुसार, श्रीराम कॉलनी येथे वास्तव्यास असलेले मुख्याध्यापक सुलताने सकाळी दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला खाजगी शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसची धडक लागल्याने ते रस्त्याच्या दुभाजकांवर पडले डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.















